रात्रीची साधारण १०.४५ ची वेळ!!!!! रायगडच्या महाद्वारापासून ११-१५० पायऱ्यांच्या अंतरावर आम्ही बसलो होतो. मी, पिनाक, अनुप, सारंग आणि आपटे काका फक्त मागे राहिलो होतो. बाकीचे केव्हाच महादार्वाज्यात पोचले असणार. पण आम्हाला त्यांचा भानच नव्हतं. आम्ही आपटे काकांना ऐकण्यात गुंग झालो होतो. खंडो बल्लाळ, कवी कलश, बाळाजी आवजी, तोरण्याचा दिवेकर, रायगडची बाजारपेठ अशा वेगवेगळ्या विषयांवर काका बोलत होते आणि आम्ही ऐकत होतो. अचानक घड्याळ पाहिलं (torch च्या उजेडात). ११.१५ झाले होते.
घोड्यांची पागा पाहून ८.२५ ला सोनार यांच्या हॉटेलात स्याक उतरवली. चहा - पोहे-भजी असा पोटभर नाश्ता करून गड पाहायला निघालो. टिळक बंगला पाहून राजाराम महाराजांच्या समाधीपाशी आलो. काकांनी राजाराम महाराजांचा संक्षिप्त इतिहास सांगितला. समाधीस वंदन करून पुढे डोणगिरी (तानाजी) कडा, तानाजी स्मारक, अमृतेश्वर मंदिर, कोन्दानेश्वर अस करत करत पुन्हा सोनारांकडे आलो. चहा घेऊन ताजेतवाने होऊन पुढे निघालो. आजचे लक्ष्य - राजगड!
देव टाक्यातील पाणी भरून कल्याण दरवाज्यातून गड सोडला आणि तटबंदीला वळसा घालून झुंझार बुरुजाच्या खाली येऊन पोहचलो. आत समोर दिसणाऱ्या डोंगर रांगेवरून चालत सुटायचे होते. कुठेही न वळता. मार्गावरचा मुख्य त्रास उन्हाचा! सावलीकारिता झाडांची संख्याहि नगण्य. जिथे सावली असायची तिथे थोडेफार थांबत मार्गक्रमण सुरु होते. शेवटच्या उंच टेकडीला वळसा घातला इथे या डोंगर रांगेला एक आडवी डोंगर रांग येऊन मिळते आणि T सारखे junction तयार होते. इथून खाली उतरायला सुरवात केली. हि वाट बर्यापैकी घसरडी आहे; घसरत पडत एका झापापाशी पोचलो. सगळ्यांनाच भूक लागली होती. जेवणाचे डबे उघडले गेले. पोटभर जेवण झाल्यावर सावलीत काही वेळ पहुडलो. राजगड पर्यंतचा बराच पल्ला गाठयचा होता. पण समोर विंझर नजरेच्या टप्प्यात होत.
झाप सोडला आणि माझी स्याक दोन ठिकाणी फाटली असल्याचा साक्षात्कार झाला. त्यावर थोडा प्रथमोपचार करून ती रायगड पर्यंत सुखरूप ठेवण्याची प्रार्थना केली आणि निघालो. साधारण ३.१५ व विन्झरला पोहचलो. गावातल्या फडके यांनी आम्हाला मोठ्या आग्रहानी त्यांच्या वाड्यात बोलावल. आपुलकीन विचारपूस केली. वाडा मोठा झक्कास आहे ! चौसोपी वाड्यात आत गेल्यावर उजवीकडे पाय धुवायला मोरी, एका बाजूला धान्यांची पोती ठेवायला जागा, डावीकडे मस्त झोपाळा!! आजच्या घडीला असा वाडा असण किती भाग्याच !! आम्ही गेलो तेव्हा मुंबई-पुण्याचे महापालिका निकाल लागत होते. त्यावर चर्चा झाली. गप्पा चालू असतानाच चहा आला. चहा झाल्यावर फडक्यांचा निरोप घेतलं आणि परत रस्ता तुडवायला लागलो.
विंझर सोडल आणि मुख्य रस्ता सोडून शेताच्या बांधावरून साखर गावाच्या दिशेन निघालो. वाटेत कानंदी नदी आडवी येते. साधारण गुडघाभर पाणी होत पात्रात. नदी पार केल्यावर लगेचच साखर आल.
यापुढची सगळी चाल डांबरी रस्त्यावरून असल्याने प्रचंड कंटाळवाणी झाली. एकदाचा तो रस्ता संपला आणि आम्ही गुंजावण्यात पुरोहितांच्या अरण्याधाम हॉटेलात पोचलो. परत चहा. रात्रीचा जेवण (पोळ्या भाजी) बांधून घेतलं. पोळ्यांचा वजन राजननी घेतलं आणि भाजीचा फिरता चषक आम्ही घ्यायचा ठरवला.
७ व. राजगड चढायला सुरवात केली. अंधार पडायला सुरवात झाली होती. मजल दरमजल करत राजगडचा तो खडा चढ पार केला आणि चोर दरवाज्यातून पद्मावती माचीवर दाखल झालो. पद्मावतीच मंदिर आधीच housefull होतं. म्हणून बाजूच्या रामेश्वराचा आधार घेतला. पुरोहितांकडून आणलेली पोळीभाजी खाऊन लगेच स्लीपिंग bag मध्ये शिरलो. झोप कधी लागली कळलच नाही.
जाग आली तेव्हा राजननी पाणी गरम करून आणलं होतं आणि प्रत्येकजण आपापल्या कप मध्ये त्या गरम पाण्याचा चहा करून घेत होता. थोड्यावेळानी कळल कि आणलेल्या स्टोव्हमध्ये काहीतरी बिघाड झाल्याने राजन आणि आपटे काकांनी सकाळी उठून चूल लावली होती. त्यांच्या मदतीला न गेल्याचा मला स्वतःचाच राग आला.
६.३० ला रामेश्वर मंदिर सोडलं. कालच्या एवढ्या तंगडतोडीनंतरदेखील पायावर ब्लिस्टरबाबा अवतरले नव्हते, त्यामुळे तसा चालायला काही त्रास नव्हता. इतरांनीही ब्लिस्टरला थोपवून धरल होतं. पद्मावती माची बघून, सदरेवर आलो. काकांनी गडाचे इतर भाग दाखवले, संक्षिप्त इतिहास सांगितला. समोरच तोरणा आणि आमचा आजचा मार्ग दिसत होतं. संजीवनी माचीकडे निघालो. रस्त्यात थोडा खालच्या बाजूला पाली दरवाजा दिसत होता. हा गडावर यायचा मुख्य दरवाजा. संजीवानीवर पोहचलो. दुहेरी तटबंदी असलेली हि माची पाहून त्यावेळच्या स्थापत्यशास्त्राला दाद द्यावीशी वाटते. अळू दरवाज्यातून गड सोडला आणि राजगड तोरणा जोडणारी डोंगर रांग पकडली. तोरण्याला पोचेपर्यंत बऱ्याच टेकड्या आपल्याला पार तरी कराव्या लागतात नाहीतर त्यांना वळसा घालून जाव लागत. साधारण ९ ला भागोजी ढेबेंच्या घराशी आलो. भागोजींच्या पत्नीने पाणी आणून दिल. केक, बाकरवडी असा नाश्ता झाला. पाणी भरून घेतल कारण इथून पुढे तोरण्यापर्यंत मध्ये कुठेही आम्हाला पाणी मिळणार नव्हत. भागोजींच घर सोडल आणि आम्ही देवराईत शिरलो. मस्त जंगल असल्याने उन्हाचा जराही त्रास जाणवला नाही.
जसजसा तोरण्याचा रड्तोंडी बुरुज जवळ येत होता जंगल विरळ होत गेल आणि उन जाणवायला लागल. शेवटच्या टप्प्यातला चढ अंगावर येणारा खडा चढ आहे. तो चढला आणि बुरुजाच्या बरोबर खाली पोचलो.
इथून बुरुजाच्या उजवीकडील खडक चढून वर जायचे. सध्या इथे शिडी लावल्याने लगेच चढून वर आलो. भिकुली बुरुजावर सावलीत थोडावेळ विसावलो. तोरण्याच्या मागच्या बाजूला असलेल्या वळण्जाई देवीच्या देवळाकडे निघालो. वळण्जाई दरवाजा ओलांडून वळण्जाई देवीपाशी पोहोचलो. पाण्याच टाक असल्याने इथेच जेवायचं ठरवल. ठेपले, लोणचं, जाम यांच्यावर तुटून पडलो. प्रत्येक ट्रेकला ठेपले खाऊन त्याचा एवढा वीट आला होता कि यापुढे ट्रेकला ठेपल्यांना हात लावणार नाही अस ठरवल होतं. पण त्या दिवशी मी माझाच ठराव मोडीत काढून ८ -१० ठेपले संपवले. थोडा आराम केला. ब्लिस्टरवर लावलेल्या पट्ट्यांची दुरुस्ती करून, पाणी भरून घेऊन, भट्टीच्या दिशेनी उतरायला लागलो.
रस्ता खूप घसरडा असला तरी बाजूला कारवीचा आधार आहे.(हि गोष्ट वेगळी कि, मी सगळ्यात मागे असल्याने मी येई पर्यंत सगळी कारवी मुळापासून उपटलेली वा तुटलेली असायची ). असाच घसरत साधारण ३ ला गावच्या वेशीवरच्या देवळापाशी आलो. जवळच व्यायामशाळा !. मग गावातून चालत चालत ३.१५ ला राम मंदिराच्या पारावर येऊन विसावलो. आपटेकाका चहा बनवून येतो असं म्हणून निघाले. रोहित हि त्यांच्या मदतीला गेला. अनुपला बरेच ब्लिस्टर आल्याने राजनने त्याला मलमपट्टी केली. चहा घेऊन पुढे निघायच्या आधी पाणी भरून घ्यायचं होतं. माझ्याकडे ५ लिटर पाणी भरलेलं होत, मी आणि पिनाक तिथेच थांबलो. गावातल्या एकानी विहिरीचा रस्ता दाखवला. सगळे त्या दिशेनी गेल्यावर गावातल्या एका माणसानी त्या विहीर दाखवणाऱ्या माणसाला विचारलं कि त्या पोरांना कुठे पाठवलं?? त्यावर त्याचा "विहिरीवर" हे उत्तर ऐकून त्या माणसाने कपाळावर हात मारून घेतला आणि म्हणाला "विहीर!! त्या पोरांना कुठे गावणारे विहीर??? केवढी लांब हाय ". यावरून विहिरीच्या अंतराची कल्पना आली आणि मी आणि पिनाक आडवे झालो.
सगळे पाणी भरून आल्यावर गेळगणीच्या दिशेने निघालो. एका गाववाल्याने 'मोलाचा' सल्ला दिला "एवढी तरुण पोरं तुम्ही!! चालत कशाला जाता ! मस्त गाडीनी जावा !!" पण आम्ही "चक्रम " चालतच निघालो. वाटेतला बांध पार करून चढण चढायला सुरुवात केली. झाडी आणि संध्याकाळ या दोन्ही गोष्टी उन्हाचा त्रास न होण्याकरता पुरेश्या होत्या. सगळेजण पुढे गेले होते. मी, पिनाक, अनुप तेवढे सगळ्यात मागे होतो. गेळगणी जवळ आल तेव्हा आम्हाला कोणाचीतरी "चक्रम "ची टोपी पडलेली मिळाली. आपल्यापैकीच कोणाचीतरी असणार म्हणून ती घेतली. गाव दिसायला लागल आणि तेवढ्यात सारंग धावत धावत मागे आला. त्याचा कॅमेरा मागे राहिला होता. आम्ही त्याला थांबवणार याच्या आधीच तो मागे धावत गेला. गावात पोहचल्यावर कळलं कि त्याचा कॅमेरा मागे कुठेतरी तो विसरला आहे. आणि त्यासाठी तो एकटाच मागे गेला होता. थोड्याच वेळात अंधार पडणार म्हणून एका गाववाल्यला मागे जाण्याची विनंती केली. त्यांनी ती मान्यही केली. रोहितहि मागे जायला तयार झाला. ते गेल्यावर आम्ही गावच्या शाळेत डेरा टाकला. गावची सगळी मुल आमच्या भोवती जमून जणूकाही आम्ही एखाद्या परग्रहावरून आलोय अशा अविर्भावात आमच्याकडे टकामका बघत होती. त्यातल्याच एका मुलाने न सांगता पाण्याची एक कळशी आमच्यासमोर आणून ठेवली. त्या मुलांमध्ये बिस्कीट वाटल्यावर क्षणार्धात पसार झाले सगळे. हे सगळ होईतो तासभर गेला. तेवढ्यात सारंग, रोहित आणि गावकरी परतले. सुदैवाने कॅमेरा सुखरूप होता.
महत्वाची माहिती -
श्री. पुरोहित
हॉटेल अरण्यधाम, गुंजवणे - ०२१३०-२८०२५१/ २१८०१९/२०४९३७ / ९४२०८६०६९१
शिवप्रसाद हॉटेल (चीत दरवाजा, रायगड)
प्रो.प्रा. नागेश देशमुख - ९४२२३५५७४५/९२७११२७३६३/९४०४५५७१२५
देशमुख उपहारगृह (रायगड)
नंदकुमार देशमुख - ९४२२६९३१८७/९०११६२९०९०
प्रसाद देशमुख - ९८५०६७६१६८/९४२०६१३४५४
अख्तर (महिंद्र पिक-अप. चीत दरवाजा ते महाड) - ९४२३३८०२६५
झुबल्या कडू, मु. कडसडी लिंगाणा माची, पो. वाघेरी, ता. महाड, जि. रायगड.
"चला चला!!!! ११.१५ झाले. १२ च्या आत महाद्वार गाठायचं ना!! उठा!!!" परत पायऱ्या चढायला लागलो. ११.३० ला महाद्वार गाठलं. १२ च्या आत महाद्वार गाठायचं हे वचन आम्ही पूर्ण केला होतं. आजवर अनेकदा हा दरवाजा ओलांडला होता . पण आज तोच महादरवाजा पाहताना विलक्षण आनंद होत होता. दोन दिवसापूर्वी सिंहगडावरून सुरु केलेला प्रवास आज तिसऱ्या दिवशी (रात्री ) या महादारवाज्यात पूर्ण होत होता. दरवाज्यात अर्धा-एक तास काका महाराजांवर बोलत होते आणि आम्ही फक्त ऐकत होतो. त्या देवडीत झोपताना गेल्या तीन दिवसांचा प्रवास डोळ्यांसमोर उलगडत गेला.
सिंहगड-राजगड-तोरणा- लिंगाणमाची- रायगड !!! काय सोल्लिड रूट!! पार पुण्यापासून कोकणात उतरायचं. दोनदा करूनही पुन्हा पुन्हा करावासा वाटणारा. आधीच्या दोन्हीवेळी आम्ही चौथ्या दिवशी रायगड गाठला पण यावेळी तो तिसऱ्या दिवशी गाठायचाच असा पणच केला होता. उपनेता असलो तरी सगळी कामं (म्हणजे सहभागींना mail करण, शिधा खरेदी, reservation वगैरे ) राजनने चोख केली होती. बेलापूरला ठाणे-स्वारगेट बसने स्वारगेटला पोहोचलो. सिंहगड पहिली बस ५ ला असल्याने स्वारगेटलाच थोडा timepass केला. राजननी सगळा हिशोब माझ्याकडे सुपूर्द केला. आता इथून पुढे सगळा हिशोब मी ठेवणार होतो. (ट्रेकमध्ये मी केलेलं हे एकमेव कामं बाकी सगळ श्रेय राजनच ). . ६.०५ ला सिंहगड साठीच्या PMT ने पायथ्याच्या आतकरवाडी या गावी पोचलो. आणि ६.३५ ला सिंहगड चढायला सुरुवात केली. पहाटेच प्रसन्न वातावरण असल्या कारणाने बरेचसे सुंदर पक्षी आमची साथ करत होते. हळू हळू उजाडायला लागल. साधारण ८ वा. पुणे दरवाज्यात पोहोचलो. | पहिला पुणे दरवाजा, सिंहगड |
घोड्यांची पागा पाहून ८.२५ ला सोनार यांच्या हॉटेलात स्याक उतरवली. चहा - पोहे-भजी असा पोटभर नाश्ता करून गड पाहायला निघालो. टिळक बंगला पाहून राजाराम महाराजांच्या समाधीपाशी आलो. काकांनी राजाराम महाराजांचा संक्षिप्त इतिहास सांगितला. समाधीस वंदन करून पुढे डोणगिरी (तानाजी) कडा, तानाजी स्मारक, अमृतेश्वर मंदिर, कोन्दानेश्वर अस करत करत पुन्हा सोनारांकडे आलो. चहा घेऊन ताजेतवाने होऊन पुढे निघालो. आजचे लक्ष्य - राजगड!
| सिंहगड पासून विंझर कडे जाणाऱ्या टेकड्या (सौजन्य: राजन महाजन ) |
झाप सोडला आणि माझी स्याक दोन ठिकाणी फाटली असल्याचा साक्षात्कार झाला. त्यावर थोडा प्रथमोपचार करून ती रायगड पर्यंत सुखरूप ठेवण्याची प्रार्थना केली आणि निघालो. साधारण ३.१५ व विन्झरला पोहचलो. गावातल्या फडके यांनी आम्हाला मोठ्या आग्रहानी त्यांच्या वाड्यात बोलावल. आपुलकीन विचारपूस केली. वाडा मोठा झक्कास आहे ! चौसोपी वाड्यात आत गेल्यावर उजवीकडे पाय धुवायला मोरी, एका बाजूला धान्यांची पोती ठेवायला जागा, डावीकडे मस्त झोपाळा!! आजच्या घडीला असा वाडा असण किती भाग्याच !! आम्ही गेलो तेव्हा मुंबई-पुण्याचे महापालिका निकाल लागत होते. त्यावर चर्चा झाली. गप्पा चालू असतानाच चहा आला. चहा झाल्यावर फडक्यांचा निरोप घेतलं आणि परत रस्ता तुडवायला लागलो.
विंझर सोडल आणि मुख्य रस्ता सोडून शेताच्या बांधावरून साखर गावाच्या दिशेन निघालो. वाटेत कानंदी नदी आडवी येते. साधारण गुडघाभर पाणी होत पात्रात. नदी पार केल्यावर लगेचच साखर आल.
![]() |
| कानंदी नदीचं पात्र ओलांडताना (सौजन्य: सारंग ) |
यापुढची सगळी चाल डांबरी रस्त्यावरून असल्याने प्रचंड कंटाळवाणी झाली. एकदाचा तो रस्ता संपला आणि आम्ही गुंजावण्यात पुरोहितांच्या अरण्याधाम हॉटेलात पोचलो. परत चहा. रात्रीचा जेवण (पोळ्या भाजी) बांधून घेतलं. पोळ्यांचा वजन राजननी घेतलं आणि भाजीचा फिरता चषक आम्ही घ्यायचा ठरवला.
| राजगड |
जाग आली तेव्हा राजननी पाणी गरम करून आणलं होतं आणि प्रत्येकजण आपापल्या कप मध्ये त्या गरम पाण्याचा चहा करून घेत होता. थोड्यावेळानी कळल कि आणलेल्या स्टोव्हमध्ये काहीतरी बिघाड झाल्याने राजन आणि आपटे काकांनी सकाळी उठून चूल लावली होती. त्यांच्या मदतीला न गेल्याचा मला स्वतःचाच राग आला.
| राजगड वरून निघायची तयारी |
६.३० ला रामेश्वर मंदिर सोडलं. कालच्या एवढ्या तंगडतोडीनंतरदेखील पायावर ब्लिस्टरबाबा अवतरले नव्हते, त्यामुळे तसा चालायला काही त्रास नव्हता. इतरांनीही ब्लिस्टरला थोपवून धरल होतं. पद्मावती माची बघून, सदरेवर आलो. काकांनी गडाचे इतर भाग दाखवले, संक्षिप्त इतिहास सांगितला. समोरच तोरणा आणि आमचा आजचा मार्ग दिसत होतं. संजीवनी माचीकडे निघालो. रस्त्यात थोडा खालच्या बाजूला पाली दरवाजा दिसत होता. हा गडावर यायचा मुख्य दरवाजा. संजीवानीवर पोहचलो. दुहेरी तटबंदी असलेली हि माची पाहून त्यावेळच्या स्थापत्यशास्त्राला दाद द्यावीशी वाटते. अळू दरवाज्यातून गड सोडला आणि राजगड तोरणा जोडणारी डोंगर रांग पकडली. तोरण्याला पोचेपर्यंत बऱ्याच टेकड्या आपल्याला पार तरी कराव्या लागतात नाहीतर त्यांना वळसा घालून जाव लागत. साधारण ९ ला भागोजी ढेबेंच्या घराशी आलो. भागोजींच्या पत्नीने पाणी आणून दिल. केक, बाकरवडी असा नाश्ता झाला. पाणी भरून घेतल कारण इथून पुढे तोरण्यापर्यंत मध्ये कुठेही आम्हाला पाणी मिळणार नव्हत. भागोजींच घर सोडल आणि आम्ही देवराईत शिरलो. मस्त जंगल असल्याने उन्हाचा जराही त्रास जाणवला नाही.
| तोरण्याच्या दिशेने |
जसजसा तोरण्याचा रड्तोंडी बुरुज जवळ येत होता जंगल विरळ होत गेल आणि उन जाणवायला लागल. शेवटच्या टप्प्यातला चढ अंगावर येणारा खडा चढ आहे. तो चढला आणि बुरुजाच्या बरोबर खाली पोचलो.
इथून बुरुजाच्या उजवीकडील खडक चढून वर जायचे. सध्या इथे शिडी लावल्याने लगेच चढून वर आलो. भिकुली बुरुजावर सावलीत थोडावेळ विसावलो. तोरण्याच्या मागच्या बाजूला असलेल्या वळण्जाई देवीच्या देवळाकडे निघालो. वळण्जाई दरवाजा ओलांडून वळण्जाई देवीपाशी पोहोचलो. पाण्याच टाक असल्याने इथेच जेवायचं ठरवल. ठेपले, लोणचं, जाम यांच्यावर तुटून पडलो. प्रत्येक ट्रेकला ठेपले खाऊन त्याचा एवढा वीट आला होता कि यापुढे ट्रेकला ठेपल्यांना हात लावणार नाही अस ठरवल होतं. पण त्या दिवशी मी माझाच ठराव मोडीत काढून ८ -१० ठेपले संपवले. थोडा आराम केला. ब्लिस्टरवर लावलेल्या पट्ट्यांची दुरुस्ती करून, पाणी भरून घेऊन, भट्टीच्या दिशेनी उतरायला लागलो.
रस्ता खूप घसरडा असला तरी बाजूला कारवीचा आधार आहे.(हि गोष्ट वेगळी कि, मी सगळ्यात मागे असल्याने मी येई पर्यंत सगळी कारवी मुळापासून उपटलेली वा तुटलेली असायची ). असाच घसरत साधारण ३ ला गावच्या वेशीवरच्या देवळापाशी आलो. जवळच व्यायामशाळा !. मग गावातून चालत चालत ३.१५ ला राम मंदिराच्या पारावर येऊन विसावलो. आपटेकाका चहा बनवून येतो असं म्हणून निघाले. रोहित हि त्यांच्या मदतीला गेला. अनुपला बरेच ब्लिस्टर आल्याने राजनने त्याला मलमपट्टी केली. चहा घेऊन पुढे निघायच्या आधी पाणी भरून घ्यायचं होतं. माझ्याकडे ५ लिटर पाणी भरलेलं होत, मी आणि पिनाक तिथेच थांबलो. गावातल्या एकानी विहिरीचा रस्ता दाखवला. सगळे त्या दिशेनी गेल्यावर गावातल्या एका माणसानी त्या विहीर दाखवणाऱ्या माणसाला विचारलं कि त्या पोरांना कुठे पाठवलं?? त्यावर त्याचा "विहिरीवर" हे उत्तर ऐकून त्या माणसाने कपाळावर हात मारून घेतला आणि म्हणाला "विहीर!! त्या पोरांना कुठे गावणारे विहीर??? केवढी लांब हाय ". यावरून विहिरीच्या अंतराची कल्पना आली आणि मी आणि पिनाक आडवे झालो.
सगळे पाणी भरून आल्यावर गेळगणीच्या दिशेने निघालो. एका गाववाल्याने 'मोलाचा' सल्ला दिला "एवढी तरुण पोरं तुम्ही!! चालत कशाला जाता ! मस्त गाडीनी जावा !!" पण आम्ही "चक्रम " चालतच निघालो. वाटेतला बांध पार करून चढण चढायला सुरुवात केली. झाडी आणि संध्याकाळ या दोन्ही गोष्टी उन्हाचा त्रास न होण्याकरता पुरेश्या होत्या. सगळेजण पुढे गेले होते. मी, पिनाक, अनुप तेवढे सगळ्यात मागे होतो. गेळगणी जवळ आल तेव्हा आम्हाला कोणाचीतरी "चक्रम "ची टोपी पडलेली मिळाली. आपल्यापैकीच कोणाचीतरी असणार म्हणून ती घेतली. गाव दिसायला लागल आणि तेवढ्यात सारंग धावत धावत मागे आला. त्याचा कॅमेरा मागे राहिला होता. आम्ही त्याला थांबवणार याच्या आधीच तो मागे धावत गेला. गावात पोहचल्यावर कळलं कि त्याचा कॅमेरा मागे कुठेतरी तो विसरला आहे. आणि त्यासाठी तो एकटाच मागे गेला होता. थोड्याच वेळात अंधार पडणार म्हणून एका गाववाल्यला मागे जाण्याची विनंती केली. त्यांनी ती मान्यही केली. रोहितहि मागे जायला तयार झाला. ते गेल्यावर आम्ही गावच्या शाळेत डेरा टाकला. गावची सगळी मुल आमच्या भोवती जमून जणूकाही आम्ही एखाद्या परग्रहावरून आलोय अशा अविर्भावात आमच्याकडे टकामका बघत होती. त्यातल्याच एका मुलाने न सांगता पाण्याची एक कळशी आमच्यासमोर आणून ठेवली. त्या मुलांमध्ये बिस्कीट वाटल्यावर क्षणार्धात पसार झाले सगळे. हे सगळ होईतो तासभर गेला. तेवढ्यात सारंग, रोहित आणि गावकरी परतले. सुदैवाने कॅमेरा सुखरूप होता.
साधारण ७ ला गेळगणीहून निघालो. मोहरी गाठणं तर शक्य नव्हत, हरपुडला मुक्काम करायचं ठरल. अंधार पडायला लागल्याने दोन गावकरी (जानकर बंधू) बरोबर घेतले. काळोख असल्याने रस्ता कळत नव्हता. आम्ही फक्त जानकारांच्या मागे यंत्रवत चालत होतो. डोंगराला एक traverse मारला कि पुन्हा तसाच traverse पुढे. असे ५-७ traverse झाल्यावर खाली हरपुडची वस्ती दिसू लागली. पण आम्ही न थांबता पुढे निघालो. हरपुडच्या थोड पुढे राहणाऱ्या बामजी यांच्या घरी आम्ही राहणार होतो. साधारण ९ ला बामजीच्या घरी पोहचलो. घरात गुरे बांधली असल्याने आम्हाला अंगणात जागा मिळाली. नो प्रोब्लेम !!!!
जानकर बंधू लागलीच परतीच्या परतीच्या प्रवासाला निघाले. त्यांचे आभार मानले, त्यांच जेवण बांधून दिलं आणि आम्ही आमच्या उदरं-भरणंच्या तयारीला लागलो. जेवण बनवायचं नव्हतं. कालच्या पोळ्या आणि त्यांच्याबरोबर आम्रखंड !! फक्त सूप बनवायचं होतं. राजनने चूल लावली. सगळ्यांच्या मदतीने सूप तयार झालं. जेवून आवरून झोपायला १०.३० झाले. उंदीर, कुत्रे यांचा त्रास असल्याने खाण्याचे पदार्थ पिशवीत घालून टांगून ठेवले. उद्याचा नाश्ता बनवण्याची जबाबदारी मी घेतली असल्याने लवकर उठायचं होतं. त्याच उघड्या अंगणात आकाशातल्या चांदण्या बघत झोपी गेलो.
| बामजीचे घर, हरपुड (सौजन्य: राजन महाजन ) |

४.३० ला जाग आली. सगळीकडे सामसूम होती. घरातला कोंबडा तेवढा स्वतःच्या आरवण्याने जागे असल्याचे संकेत देत होता. होतं तेवढ्या पाण्यात आदल्या रात्रीची भांडी घासली. तोपर्यंत काल "मदतीला येऊ" अस आश्वासन देणारे उठतील अशी अपेक्षा होती. पण कोणीच उठलं नाही. बर रात्री अंधारात कोण तसं बोललं होतं तेहि मला आठवत नव्हत. दोघातिघांना उठवण्याचे निष्फळ प्रयत्न केले. शेवटी एकट्यानेच चूल पेटवली. चहासाठी पाणी गरम करत ठेवल आणि राजन मदतीला आला. त्याने चुलीची लाकड वगैरे नीट लाऊन दिली. पटापट चहा केला, पोहे बनवले. पोहे वाढायची जबाबदारी पिनाकवर सोपवून "इतर" कामांसाठी गेलो.
यापुढच्या प्रवासात आम्हाला शिधा लागणार नव्हता. म्हणून गरजेपुरत्या गोष्टी ठेऊन बाकी समान बामजींना देऊन टाकल. पोहे थोडे जास्तच झाले होते तेही दिले. ७ ला मोहरीच्या दिशेन निघालो. लगेचच मोहरी गावात पोहोचलो कारण रात्री आम्ही हरपुडला न राहता त्याच्या बरच पुढे आलो होतो. आजचा आपला दिवस इतर दोन दिवसांपेक्षा सोपा असणार हे माझा म्हणण किती फोल होतं हे मला नंतरच्या प्रवासात जाणवल.
मोहरीत मोरे यांच्या अंगणात घटकाभर थांबलो. पाणी वगैरे प्यालो. आज काहीही झालं तरी रायगड गाठायचा असा ठरवल्याने लगेच निघालो. बोराट्याच्या नाळेची सुरुवात होते तिथे लगोऱ्या रचून ठेवल्यात. तिथे स्याका ठेवल्या आणि रायलिंग पठारावर निघालो. समोरच लिंगाण्याचा सुळका उभा ठाकला होता. मागे रायगडहि खुणावत होता. लिंगाण्याच सौंदर्य कॅमेरात टिपत माघारी स्याकपाशी आलो.
| रायलिंग पठारावरून दिसणारा लिंगाणा |
बोराट्याची नाळ चालू झाली. दगड-धोंड्यांचा रस्ता. पावसाळ्यात इथे सोल्लिड धबधबा असणार. जमेल तसं जमेल तिथून उतरत सुटलो.
एक कातळ उतरला कि खाली न उतरता उजवीकडे वळायच आणि लिंगाण्याच्या दिशेनी चालायचं.
डोंगराच्या पोटात अरुंद वाट आहे.
या रस्त्यांनी रायलिंग पठाराला खालच्या बाजून वळसा मारून रायलिंग लिंगाणा खिंडीत पोचलो. बिस्कीट, बाकरवड्या, चिक्की खाऊन झाल्यावर आता लिंगाणमाचीचे वेध लागले. लिंगाण्याकडे तोंड करून खिंडीत उभे राहिले कि उजवीकडे एक वाट कारवीत घुसते. हीच वाट पकडली. थोडं उतरल्यावर प्रचंड घसारा. त्यात उतार खूप जास्त. कारवीचा आधार घेत घेत एकदाचा तो घसरडा रस्ता संपवला
आणि पुन्हा दगडातली वाट सुरु झाली.
हि वाटही खालपर्यंत उतरते.
पण पूर्ण खाली न जाता डावीकडे जाणारा रस्ता पकडला कि आलो लिंगाणमाचीवर!
गावात घरं बरीच असली तरी राहतं कुटुंब एकच. झुबल्या कडू याचं! त्यांच्याच घरी जेवण करायचं ठरवल. पुरणपोळ्यांचा मेनू! मग काय ..सगळे तुटून पडले. श्री व सौ कडूंनी आपुलकीन विचारपूस केली. आपटेकाकांनी त्यांच्याकडची औषधं त्यांना दिली. कोणतं औषध कधी घ्यायचं तेही लिहून दिलं. थोडं आराम करून निघायचं ठरवल.
| नाळेच्या तोंडाशी |
![]() |
| शेवटी हा कातळ उतरला कि उजवीकडे लिंगाण्याच्या दिशेनी जायचं (सौजन्य: सारंग ) |
डोंगराच्या पोटात अरुंद वाट आहे.
![]() |
| बोराट्याच्या नाळेतील बोल्ट - इथे नाळेतून बाहेर पडून खिंडीकडे जाणारी वाट घ्यायची. (फोटो सौजन्य - सारंग) |
या रस्त्यांनी रायलिंग पठाराला खालच्या बाजून वळसा मारून रायलिंग लिंगाणा खिंडीत पोचलो. बिस्कीट, बाकरवड्या, चिक्की खाऊन झाल्यावर आता लिंगाणमाचीचे वेध लागले. लिंगाण्याकडे तोंड करून खिंडीत उभे राहिले कि उजवीकडे एक वाट कारवीत घुसते. हीच वाट पकडली. थोडं उतरल्यावर प्रचंड घसारा. त्यात उतार खूप जास्त. कारवीचा आधार घेत घेत एकदाचा तो घसरडा रस्ता संपवला
| खिंडीनंतरचा घसारा |
आणि पुन्हा दगडातली वाट सुरु झाली.
हि वाटही खालपर्यंत उतरते.
| रायलिंग डोंगर सोडून या झाडापाशी लिंगण माचीला वळायचे. |
पण पूर्ण खाली न जाता डावीकडे जाणारा रस्ता पकडला कि आलो लिंगाणमाचीवर!
गावात घरं बरीच असली तरी राहतं कुटुंब एकच. झुबल्या कडू याचं! त्यांच्याच घरी जेवण करायचं ठरवल. पुरणपोळ्यांचा मेनू! मग काय ..सगळे तुटून पडले. श्री व सौ कडूंनी आपुलकीन विचारपूस केली. आपटेकाकांनी त्यांच्याकडची औषधं त्यांना दिली. कोणतं औषध कधी घ्यायचं तेही लिहून दिलं. थोडं आराम करून निघायचं ठरवल.
अडीचला निघालो. झुबल्या कडू विहीर दाखवायला आले. निघताना त्यांच्या पत्नीन मला बाजूला नेऊन सांगितल कि "त्यांना पान्यापर्यंत नेऊ नका. पिऊन येतील." हो म्हणून निघालो. विहिरीवर पाणी भरलं. उतरताना उन्हाचा त्रास जाणवायला लागला. माची उतरून एक झाडाच्या सावलीत थांबायच ठरवल. उन प्रचंड होतं. सावलीत गप्पा झाल्या. उन्हाचा तडाखा थोडा का होईना कमी झाला असा अंदाज बांधून निघालो. पान्यात पोहचलो. मागे जेव्हा हा ट्रेक केला होता तेव्हा तिसरा मुक्काम आम्ही पान्यात केला होता. त्या आठवणी ताज्या करतच पुढे निघालो. मध्ये नदीच पात्र पार केल आणि वाघेरीत दाखल झालो.
गावातल्या एक पोरानं "अंगठ्यावरून आलात??" अस विचारल (या भागात लिंगाण्याला अंगठ्याचा डोंगर असही म्हणतात हि नवी माहिती मिळाली.) आम्ही त्याला कुठून आलो ते सांगितल आणि चहासाठी चौकशी केली. आम्ही सिंहगड पासून चालत आलोय हे कळल्यावर तो मुलगा आम्हाला त्याच्या घरी घेऊन गेला आणि त्याच्या आईला म्हणाला "हे लोक दोन दिवसापासून चालत सिंहगडावरून आलेत, यांना चहा बनवून दे ". खरच!! इथल्या लोकांना माणुसकी शिकवावी लागत नाही. जन्माला येतानाची ती ते घेऊन येतात.
| वाघेरीतून होणारं लिंगाण्याच विहंगम दर्शन |

थांबायला वेळ नव्हता. टकमकवाडीला पोहोचलो. पाणी पिऊन तडक पुढे निघालो. रायगडवाडी गाठायची होती. पुढचा पूर्ण रस्ता अतिशय कंटाळवाणा झाला. हळूहळू काळोख पडू लागला. राजन पुढे गेला होता. आम्ही हळू हळू मागून येत होतो. ती कंटाळवाणी चाल काही केल्या संपतच नव्हती. पिनाकनि तर "वांझोटी चाल" अस त्या चालीचं वर्णन करून आमच्या सगळ्यांच्याच मनातल्या भावनांना शब्दबद्ध केलं. हळू हळू दूरवर चीत दरवाज्याचे दिवे दिसू लागले. तसं पायांमध्ये जोर आला. पण काही केल्या रायगडवाडी येत नव्हती. अखेरीस अथक परिश्रमानंतर रायगडवाडीशी पोचलो. राजन आधीच तिथे पोहचून रस्त्याच्या बाजूला आराम करत पडला होता. रात्र झाल्याने इथेच राहून सकाळी रायगड पहायचा हा एक पर्याय होता, पण सगळ्यांनी तो झीरकाडला. म्हणून आधी जेऊन मग चढाई करायचं ठरवल.
राजन आणि काका पुढे गेले. आम्ही हळू हळू मागून येत होतो. चीत दरवाज्यापाशी असलेल्या देशमुखांनी त्यांच्या हॉटेलात आम्हाला जेऊ घातलं. अनुपचा एक ब्लिस्टर फारच बळावला असल्याने राजननि तो फोडून मलमपट्टी केली. अनुपनीदेखील पूर्ण ट्रेक भर एका शब्दांनीही कधी चालण्याबाबत तक्रार केली नाही.
साधारण १०.वा रायगड चढायला सुरुवात केली होती आणि आत्ता महादरवाज्यात पोचल्यावर सगळ्यांनाच स्वताचा अभिमान वाटत होता.
दुसऱ्या दिवशी जरा उशीराच उठलो. जो जेव्हा उठेल तसं त्यांनी गडावर यायच अस ठरल होतं. राजन आणि काका आधीच गडावर निघून गेले होते. काही वेळानी आम्हीही गडावर पोचलो. देशमुखांकडे खिचडी खाल्ली आणि गडदर्शनाला निघालो.
शिरकाई देवीच दर्शन घेऊन, बाजारपेठ बघत जगदिश्वराकडे निघालो. जगदीश्वराच दर्शन घेतल. मला ओढ लागली होती ती समाधीच्या जागेवरून मागे दूरवर तोरणा आणि राजगड पाहण्याची आणि स्वताचीच पाठ थोपटून घ्यायची. पण राजगड दिसला नाही, तोरणा खुपसा अंधुक दिसला. ज्यायोगे ते दिसत नाहीत त्याअर्थी आम्ही खूप खुप खूप खूप पल्ला पार करून आलो होतो याचा आनंद झाला. त्या दिवशी महाराजांच्या समाधीवर डोक ठेवताना महाराजांकडे एकंच मागण मागितल "यापुढे असे ट्रेक वारंवार करण्याची बुद्धी आणि शक्ती द्या !!!!!!"
- पंडित मंगेश माधव
| महादरवाज्यात गाढ झोपी गेलेली मंडळी. (सौजन्य: राजन महाजन ) |
दुसऱ्या दिवशी जरा उशीराच उठलो. जो जेव्हा उठेल तसं त्यांनी गडावर यायच अस ठरल होतं. राजन आणि काका आधीच गडावर निघून गेले होते. काही वेळानी आम्हीही गडावर पोचलो. देशमुखांकडे खिचडी खाल्ली आणि गडदर्शनाला निघालो.
| याचसाठी केला होता अट्टाहास !!! |
- पंडित मंगेश माधव
महत्वाची माहिती -
श्री. पुरोहित
हॉटेल अरण्यधाम, गुंजवणे - ०२१३०-२८०२५१/ २१८०१९/२०४९३७ / ९४२०८६०६९१
शिवप्रसाद हॉटेल (चीत दरवाजा, रायगड)
प्रो.प्रा. नागेश देशमुख - ९४२२३५५७४५/९२७११२७३६३/९४०४५५७१२५
देशमुख उपहारगृह (रायगड)
नंदकुमार देशमुख - ९४२२६९३१८७/९०११६२९०९०
प्रसाद देशमुख - ९८५०६७६१६८/९४२०६१३४५४
अख्तर (महिंद्र पिक-अप. चीत दरवाजा ते महाड) - ९४२३३८०२६५
झुबल्या कडू, मु. कडसडी लिंगाणा माची, पो. वाघेरी, ता. महाड, जि. रायगड.

एकदम मस्त रे! छान लिखाण!! मीही आशू, विनय, आपटेकाकांबरोबरच ८-१० वर्षांपूर्वी हा ट्रेक केला होता. आमचाही ३ रा मुक्काम पाने गांवात झालेला.. :)
ReplyDelete..ब्लॉगची सुरुवात तर झक्क्कास मोहिमेने झालीये.. आता आम्हांला उत्तम लिखाण वाचायला मिळणार ..!:)
are tya trekla mi pan hoto...... aashu barobarchya
ReplyDeleteउत्तम लिखाण !! माझा लेख फक्त वेळापत्रक आणि मार्गाची माहिती देतो. तुझा लेख ट्रेकचा प्रत्यक्ष अनुभव देतो. मार्गक्रमण करताना आलेल्या अनुभवाची प्रचीती या लेखातून येते.
ReplyDeleteमाझ्या बेचव लेखात तुझ्या लेखाचे मीठ घातले तर सोल्लिड टेस्टी लेख होईल......
असेच लिहित राहा, थांबू नकोस. लिहिण्यासाठी फक्त ट्रेक हाच एक विषय असे मानू नकोस.
राजन.
Masta Mitra - Surekh lihilays. Ani Rajanchahi blog gr8 hota.
ReplyDeletePARAG
मस्त शब्दांकित केलायस sollid ट्रेक!!!!!u r a gr8 leader Mangesh....its fun trekking with u....keep trekking....keep writing....
ReplyDeleteअप्रतिम ... समोर सारे चित्र उभे केलस मित्रा ..!! वर्णनकार आहेस तू कौशाल्यवान ..!!
ReplyDeletesuperb :)
ReplyDeleteWe are planning for Torna to Raaigad trek this winter :) Your blog will definitely help us. Keep trekking, keep wandering, keep writing :)
Jai Bhavani, Jai shivaji.
खूपच छान वर्णन केलेत आपण...
ReplyDelete