“महाराष्ट्रातल
सगळ्यात उंच शिखर कोणत?”, शाळेतले सर आम्हाला विचारायचे आणि आम्ही सगळी पोरं
एकसुरात “क ळ सु बा ई” असं ओरडायचो. पुढे डोगर भटकायचा छंद लागल्यावर तर कळसुबाई
बद्दल एक विलक्षण आकर्षण निर्माण झालं. रतनगड, कात्राबाई, अलंग मदन कुलंग,
भंडारदरा ..... प्रत्येक वेळी कळसुबाईचं शिखर साथ करायचं, पण तिथे जायचा योग अजून
आला नव्हता. दर वेळी काही ना काही कारणांनी तिथे जायचे आमचे मनसुबे उधळले जात
होते. कळसूआई च्या मनात होतं तरी काय??
सह्यांकन २०१५
नुकतंच संपलं होतं आणि चक्रम हायकर्सचं पुढील वेळापत्रक काढायची लगबग सुरु झाली.
अनायसे मला वेळ होता. बऱ्याच वर्षांपासून हुलकावणी देणारा कळसुबाई trek केला तर? उत्तम
!!! परम मित्र ओंकार यानी हा ट्रेक रात्री करायची कल्पना मांडली. अतिउत्तम !!!
त्यानीच तिथले गावकर्यांचे फोन नंबर वगैरे मदत केली. .... ठरलं तर !! कळसुबाई
करायचा – आणि रात्री आणि शिखरावरून सूर्योदय पहायचा. लगेच पौर्णिमेच्या आसपासचे
रविवार शोधले गेले आणि २० फेब्रुवारी हि रात्र निवडली. चथुर्दशी होती कदाचित.
चंद्रप्रकाश भरपूर असणार. कसा असेल कळसुबाई चा शिखरमाथा? वारा कसा असेल? वरून
दृश्य कसा दिसत असेल? अश्या प्रश्नांचा विचार करत करत दिवस ढकलत होतो. शेवटी तो
दिवस (रात्र) उजाडला.
आम्ही सगळे मुलुंडला रात्री १०.०० ला भेटलो. गायत्री, प्रणव सारखे बरेच जुने मित्र भेटले. सामानाची जमवा-जमव करून निघायला १०.३० वाजले. ठाणा ओलांडून गाडी नाशिक हायवेला लागली तोपर्यंत सगळे झोपेच्या आधीन झालेले. एका अर्थी चांगलच होतं ते. रात्री जगायच होतं ना शिखर चढायला. बारी गावातल्या संतोष खाडेशी बोलणं झाल होतं. त्याला घोटीला पोचल्यावर फोने करायचा होता. तो आम्हाला गावात पोचल्यावर चहाची सोय करणार होता आणि एक वाटाड्या देखील सोबतीला देणार होता. ठरल्याप्रमाणे त्याला आम्ही घोटी ला पोचल्याचं कळवलं आणि गाडीनी भंडारदरा रस्ता धरला. दूरवर एक उंच शिखर आणि त्यावर चमकणारे दिवे दिसायला लागले आणि गाडी रस्ता चुकत-चुकत मध्यरात्री २.०० वाजता बारी गावात पोचली.
छानसं टुमदार गाव! कळसुबाई गावकऱ्यांच आराध्य दैवत! प्रत्येक ठिकाणी “कळसुबाई प्रसन्न” लिहिलेल आढळल. कळसुबाईनीच तर त्यांच्या रोजगाराची सोय केली आहे. कळसुबाई शिखर चढायला येणाऱ्यांसाठी गावकरी जेवण, चहा, नाष्टा, ... एवढाच काय टेंट देखील पुरवतात. आता याला बाजारीकरण म्हणायच कि नाही हा वादाचा मुद्दा पण गावकऱ्यांना रोजगार मिळालाय एवढ नक्की.
सौ. संतोष खाडेंनी आम्हाला चहा बनवून दिला. तिथल्याच हनुमान मंदिरात चहा घेत
घेतच सहभागींना नियम वगैरे सांगितले. हे सगळं होऊन २.४५ वाजता आम्ही चढाईला सुरुवात केली.
फारशी अंगावर येणारी चढण नसल्याने जास्त दमणूक होत नव्हती. १५-२० मिनिटाच्या अंतरावर एक देऊळ लागलं. आमच्या torch च्या उजेडात ते नक्की कोणत्या देवाचं देऊळ आहे ते काही कळल नाही. बहुदा तांदळा असावा असा विचार करून त्या देवबाप्पाला नमस्कार करून आम्ही पुढचं मार्गक्रमण सुरु
केलं. चंद्रप्रकाश एवढा लक्ख होता कि आम्हाला torch अजिबात लावली लागलीच नाही.
मधे-मधे थांबत विसावा घेत घेत आमचा शेवटचा डबा रस्ता तुडवत होता. एका ठिकाणी
विसावा घेत असताना आमच्यातल्याच शर्वरीनी “श्रीखंडाच्या वड्या” खायला काढल्या.
बऱ्याच वर्षांनी त्या वड्या पाहून एकदम लहानपणाची आठवण आली ... आम्ही सगळे खुश !!!
.... मग काय .... हाणल्या चांगल्या ७-८ वड्या !!
थोड्याच वेळात आम्हाला पहिली शिडी लागली. शिडी कसली ... लोखंडाचा शिडीच्या आकाराचा ढाचा टेकवून फिट्ट केलाय. प्रत्येक पावलागणिक ती शिडी मस्त हलत होती. शेवटी एकदाची ती शिडी पार झाली. अशीच थोड्या वेळानी दुसरी शिडी लागली. त्या मानानी थोडीशी मोठी वाटणारी. ती पार करून वर आलो तर वरती एक गावातले मामा लिंबू सरबत घेऊन तयार. बरेचसे सहभागी आधीच पुढे गेलेले होते, आम्ही काही मोजकेच लोक मागे राहिलो होतो. मस्तपैकी सरबत पिऊन तरतरीत झालो. मामांना विचारलं, “अजून किती राहिल ?” ... “ हे काय आलं कि हिथ. अस्सा एवढा टेमका चढून गेलात नव्ह का कि आलच” ... आता गावकऱ्यांच “आलं कि हिथ” आणि आपल्याला लागणारा वेळ यात बराच फरक असतो हे मी जाणून होतो. ते गाववाले मामा सरबत संपलं म्हणून परत बारीत जायला निघाले आणि आम्ही देखील त्यांना “राम राम “ करून पुढचा रस्ता धरला.
रात्री गाडीतून दिसणारे ते दिवे आता जवळ असल्यासारखे दिसत होते. चांदोबा दिसेनासा झाला होता. सूर्योदय होण्याची चिन्ह दिसायला लागली होती. “चला चला ! लवकर ! सूर्य उगवायच्या आत माथा गाठायचं” असं म्हणत एकमेकांना प्रोत्साहन देत आम्ही ती शेवटची चढण चढायला लागलो. या चढणीच्या आधीच्या पठारावर १/२ झापांमध्ये काही पर्यटक रात्रीच येऊन राहिले होते तर काहींनी त्यांचे तंबू बाहेर गाडले होते. त्या सर्वांना मागे टाकत आम्ही शेवटचा चढ चढू लागलो. शेवटी कळसुबाईचं ते छोटेखानी सुबक देऊळ दिसायला लागलं आणि आकाशाचे रंग देखील हळू हळू बदलायला सुरुवात झाली.
६ वाजता
त्या देवळाशी पोचलो आणि कॅमेरा काढून तयार झालो. हळू हळू तो तेजाचा स्वामी आम्हाला
दर्शन देण्यासाठी क्षितिजावर अवतरायला सुरुवात झाली. किती सुरेख अनुभव! रंगांची
उधळण करत सुर्व्यादेव हळू हळू पूर्ण दिसायला लागला. त्याची किरणं फाकली जाऊ लागली
आणि अक्ख्या आकाशात त्या तांबूस लाल रंगाचा सडा पडला.

साहेबराव आधीच खालच्या पठारावर पोचले होते (वास्तविक साहेबराव हा माझ्यापेक्षा
लहान मुलगा होता, पण “साहेबराव” या नावालाच अरे-तुरे केलेलं बर दिसत नाही, म्हणून
हे आदरार्थी बहुवचन).
त्यांनी आधीच आमच्या साठी चहा आणि पोहे यांचा छान बंदोबस्त केला होता. कडकडून भूक लागली होती. पोह्यांवर तुटून पडलो. त्या पठ्यानी पण काय चविष्ट पोहे केलेले ! मग त्या चहा पोह्यांचा आस्वाद घेत घेत आम्ही ओळख परेड करून घेतली. याच पठारावर एक विहीर आहे. कळसुबाईच्या पूर्ण रस्त्यावर बारी नंतर हि एकच पाण्याची सोय. बाकी रस्त्यात पाणी नाही.
९.३० ला आम्ही शिखर उतरायला सुरुवात केली. जस जसं उन वाढायला लागलं तसतसं आम्ही रात्री ट्रेक केल्याबद्दल सुटकेचा निश्वास सोडला आणि मजल दरमजल करीन ११.३० ला बारी गावात पोचलो. खाडेंकडेच जेवण केलं. छान डाळ- भात, भाकरी, कोबीची भाजी, लोणचं वगैरे. कोबीच्या भाजीचा लालभडक रंग त्याच्या चवीची वर्दी देत होता. त्यांच्याच घरात मस्त पंगत बसली. जेवणानंतर ताक!
१.३० ला परतीच्या प्रवासाला सुरुवात केली ती सुंदर आठवणी घेऊनच. अनेक आठवणी ! रात्री शिखर चढताना सर्वात मागे राहून प्रणव, गौरव बरोबर केलेली ती भंकस, तो शिडी हलताना उडालेला जीवाचा थरकाप, माथ्यावर MSR लावून maggi करायचे निष्फळ प्रयत्न, माथ्यावर शेट्टीचं, शाल अगदी डोक्यावरून घेऊन झोपणं, भरत, अंबरीश, कौस्तुभया कॉलेजच्या मित्रांबरोबर काढलेले selfie आणि सर्वात महत्वाच म्हणजे माथ्यावरून दिसणारा आमचा प्रिय सह्याद्री! त्याला वचन दिलंय ... लवकरच परत येईन .... येणार का मग तुम्ही ? सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळायला ?
थोड्याच वेळात आम्हाला पहिली शिडी लागली. शिडी कसली ... लोखंडाचा शिडीच्या आकाराचा ढाचा टेकवून फिट्ट केलाय. प्रत्येक पावलागणिक ती शिडी मस्त हलत होती. शेवटी एकदाची ती शिडी पार झाली. अशीच थोड्या वेळानी दुसरी शिडी लागली. त्या मानानी थोडीशी मोठी वाटणारी. ती पार करून वर आलो तर वरती एक गावातले मामा लिंबू सरबत घेऊन तयार. बरेचसे सहभागी आधीच पुढे गेलेले होते, आम्ही काही मोजकेच लोक मागे राहिलो होतो. मस्तपैकी सरबत पिऊन तरतरीत झालो. मामांना विचारलं, “अजून किती राहिल ?” ... “ हे काय आलं कि हिथ. अस्सा एवढा टेमका चढून गेलात नव्ह का कि आलच” ... आता गावकऱ्यांच “आलं कि हिथ” आणि आपल्याला लागणारा वेळ यात बराच फरक असतो हे मी जाणून होतो. ते गाववाले मामा सरबत संपलं म्हणून परत बारीत जायला निघाले आणि आम्ही देखील त्यांना “राम राम “ करून पुढचा रस्ता धरला.
रात्री गाडीतून दिसणारे ते दिवे आता जवळ असल्यासारखे दिसत होते. चांदोबा दिसेनासा झाला होता. सूर्योदय होण्याची चिन्ह दिसायला लागली होती. “चला चला ! लवकर ! सूर्य उगवायच्या आत माथा गाठायचं” असं म्हणत एकमेकांना प्रोत्साहन देत आम्ही ती शेवटची चढण चढायला लागलो. या चढणीच्या आधीच्या पठारावर १/२ झापांमध्ये काही पर्यटक रात्रीच येऊन राहिले होते तर काहींनी त्यांचे तंबू बाहेर गाडले होते. त्या सर्वांना मागे टाकत आम्ही शेवटचा चढ चढू लागलो. शेवटी कळसुबाईचं ते छोटेखानी सुबक देऊळ दिसायला लागलं आणि आकाशाचे रंग देखील हळू हळू बदलायला सुरुवात झाली.
![]() |
| शिखर माथ्यावरील कळसुबाई मंदिर (सौजन्य : मानसी देशमुख ) |
![]() |
| (सौजन्य : मानसी देशमुख ) |
थोडा वेळ तिथेच माथ्यावर घालवला. कळसुबाई ला खेटून अलंग – मदन चे कातळकडे
त्यांच्या राकटतेची साक्ष देत होते. रतनचा खुट्टा ढगात घुसून गगनाला गवसणी घालत
होता. लांबवर अवंध-पट्ट्याच्या पवनचक्क्या दिसत होत्या. चौफेर दिसणारं हे
सह्याद्रीच न्यारं रुपडं नजरेत साठवत उतरायला सुरुवात केली.

![]() |
| शेवटची शिडी (सौजन्य : प्रज्ञा ) |
त्यांनी आधीच आमच्या साठी चहा आणि पोहे यांचा छान बंदोबस्त केला होता. कडकडून भूक लागली होती. पोह्यांवर तुटून पडलो. त्या पठ्यानी पण काय चविष्ट पोहे केलेले ! मग त्या चहा पोह्यांचा आस्वाद घेत घेत आम्ही ओळख परेड करून घेतली. याच पठारावर एक विहीर आहे. कळसुबाईच्या पूर्ण रस्त्यावर बारी नंतर हि एकच पाण्याची सोय. बाकी रस्त्यात पाणी नाही.
![]() |
| चहा - गप्पा भन्नाट combination (सौजन्य : मानसी देशमुख ) |
९.३० ला आम्ही शिखर उतरायला सुरुवात केली. जस जसं उन वाढायला लागलं तसतसं आम्ही रात्री ट्रेक केल्याबद्दल सुटकेचा निश्वास सोडला आणि मजल दरमजल करीन ११.३० ला बारी गावात पोचलो. खाडेंकडेच जेवण केलं. छान डाळ- भात, भाकरी, कोबीची भाजी, लोणचं वगैरे. कोबीच्या भाजीचा लालभडक रंग त्याच्या चवीची वर्दी देत होता. त्यांच्याच घरात मस्त पंगत बसली. जेवणानंतर ताक!
१.३० ला परतीच्या प्रवासाला सुरुवात केली ती सुंदर आठवणी घेऊनच. अनेक आठवणी ! रात्री शिखर चढताना सर्वात मागे राहून प्रणव, गौरव बरोबर केलेली ती भंकस, तो शिडी हलताना उडालेला जीवाचा थरकाप, माथ्यावर MSR लावून maggi करायचे निष्फळ प्रयत्न, माथ्यावर शेट्टीचं, शाल अगदी डोक्यावरून घेऊन झोपणं, भरत, अंबरीश, कौस्तुभया कॉलेजच्या मित्रांबरोबर काढलेले selfie आणि सर्वात महत्वाच म्हणजे माथ्यावरून दिसणारा आमचा प्रिय सह्याद्री! त्याला वचन दिलंय ... लवकरच परत येईन .... येणार का मग तुम्ही ? सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळायला ?

मस्त वर्णन. मजा आली.
ReplyDeleteधन्यवाद !!!
Deleteआणि हो मानसीने काढलेले फोटो सुद्धा सुंदरच आहेत.
ReplyDelete