सह्याद्री च्या कुशीत, निसर्गाच्या सानिध्यात एक छोटंसं टुमदार घर असावं. चारही बाजूंनी डोंगर दऱ्यानी वेढलेलं. ३-४ किल्ले हे असे हाकेच्या अंतरावर !!! रात्रीच्या बोचर्या थंडीत मस्त उबदार शेकोटी लावलीये. मुकेश, किशोर, रफी, मन्नादा, लता, आशा, RD, SD, यांचे स्वर, गीत ऐकत, रात्रीची चांदणी न्याहाळत झोपी जावं !
या सह्याद्रीशी गट्टी जमल्यापासूनचं माझं हे स्वप्नंच तोरणा-राजगड ट्रेकच्या निमित्तानं काही प्रमाणात का होईना पूर्ण झाल. भागोजीच्या झापासमोरच्या अंगणात शेकोटी पेटली होती. जुने-नवे चक्रम एकत्र होते. मग काय ... जुन्या गाण्यांची धमाल मैफिल जमली ना राव !! अक्ख्या दिवसाचा शीण कुठच्या कुठे गायब.स्वराज्यातला पहिला किल्ला आणि स्वराज्याची पहिली राजधानी ! दोन दिवसाचा जबरी ट्रेक ! अशी संधी कोण सोडणार. आदित्य , अमेय, मानसी यांचा प्लान शेवटपर्यंत बदलतच होता. आधी राजगड-तोरणा, मग रात्री तोरणा चढून दुसर्या दिवशी राजगड अस काहीतरी. दर वेळी मी "काय ठरलं शेवटी ?" असं विचारलं कि नवीनच काहीतरी प्लान कळायचा. शेवटी एकदाचा प्लान ठरला. राजगडावर असणारी "जत्रा" लक्षात घेऊन आम्ही राजगड-तोरणा ऐवजी "तोरणा-राजगड" करायचं ठरवलं. तसाही माझा तोरणा पूर्ण बघायचा बाकीच राहिल होता. सिंहगड-रायगड ट्रेक च्या वेळी तोरणा फक्त ओलांडला होता बुधला माचीवरून... आता तोरण्यावरून राजगडापर्यंतची वाटचाल करू ...... कुछ हटके हो जाये !!!
ठरल्या रात्री सगळे चक्रमवर भेटलो. रात्री तोरण्याच्या पायथ्याला म्हणजे वेल्ह्याला जाऊन राहायचे आणि लवकर निघून तोरणा चढायचा असं ठरलेलं. आमचे परममित्र ओंकार शेठ ओक उर्फ टोम्या यांच्या मार्गदर्शनाखाली planning झालेलं, ते कसं चुकणार !! "अबे, माझ्या घरावरुनच जाणार ना तू .. निघाला कि सांग , येतो भेटायला..."इति ओंकार. "सांगतो कि, पण उशीर होईल रे उगाच तुला झोपायला ... त्यात तू पुण्याचा", " ये ये आहे मी जागा, लिहायलाच बसलोय"
रिवाजाप्रमाणे बस काही वेळेवर आली नाही. मुलुंडच्या "मंडपा"त चहाचा पहिला कार्यक्रम पार पडला. चहाचा एक फोटो ओंकारला पाठवला. " साल्या, निघाला नाही अजून?" ... निघायलाच बराच उशीर होईल म्हणून ओंकारला पुढच्या वेळी भेटण्याचं कबुल केल आणि परत चक्रमशी येऊन थांबलो. शेवटी मध्यरात्री आमचे सारथी डायवर गाडी हाकीत आम्हाला न्यायला आले. "गणपती बाप्पा मोरया" म्हणत आम्ही बसमध्ये बसलो आणि गाडीने पुण्याचा रस्ता धरला. पुण्याला शमांगी ताई, अश्विनी यांनी कोरम पूर्ण केला. पुढे पिनाकच्या सखोल मार्गदर्शनाखाली गाडी नसरापूर फाटा- वेल्हा रस्ता पार करून वेल्ह्यात पोहोचलो.
गाव अजूनही गुलाबी थंडीची चादर ओढून झोपलेलंच होतं. तिथल्याच एका पडवीत थोडावेळ विसावलो. काही वेळातच हॉटेलवाल्यानी दार उघडलं आणि चहाचा दुसरा अध्याय पार पडला. बाहेरहि उजाडायला सुरुवात झाली होती. नाष्ट्याला झक्कास मिसळ-पाव. कोणत्याही ट्रेकला जर एकदाही मिसळ नसेल तर तो माझ्या मते फाउल मानला जातो. हॉटेलात इतरही पर्यटक/ हौशी ट्रेकर्स यायला सुरुवात झाली. आम्ही "चक्रम" असल्याचं समजल्यावर त्यांना खूपच आनंद झाला. त्यातल्या बऱ्याच जणांनी "सह्यांकन" मधे सहभाग घेतला होता. "चक्रम" हे नाव ऐकल्यावर त्यांनी ज्या आदरानी/ आश्चर्यानी आमच्याकडे पाहिलं, त्यामुळे चक्रम शी जोडला गेल्याचा पुन्हा एकदा अभिमान वाटला.
"चला ! चला ! चला ! .... " अमेय, मानसीच्या हाका सुरु झाल्या. ट्रेकला सुरुवात करायची वेळ झाली. मानसी, अमेय यांनी एका वाटाड्याशी आधीच बोलून ठेवलं होतं. सीताराम त्याचं नाव ... ते आम्हाला तोरण्यापासून राजगडापर्यंत सोबत करणार होते. पिनाक आणि सीताराम मामा यांच्यात पुढील मार्गावर "सखोल" चर्चा झाली आणि यापुढे गाडी जाणार नाही असं ठरलं. Sack पाठीवर चढवून आम्ही तोरण्याच्या दिशेनी चालू लागलो.

पुढच्या पाचच मिनिटात चढ सुरु झाला आणि आम्हाला पुढच्या मार्गाची कल्पना आली. बाकी सगळे कधीच पुढे निघून गेले होते. मी, तन्मय, मानसी, अमेय तेवढे मागे राहिलो होतो. वाटेत ताक, लिंबूसरबत यांच्या जोरावर आम्ही किल्ल्याच्या अर्ध्यावर पोहोचलो. तोरण्याचा आवाढव्य पसारा त्याच्या "प्रचंड"पणाची साक्ष देत होता. तेवढ्यात किल्ल्यावरून दुसरा एक ग्रुप खाली येत होता. त्यातल्या एकाशी थोड्या गप्पा झाल्या. पुण्याचा कोणतातरी ग्रुप होता. १५० लोकांचा .... आणि बरोबर ट्रेकिंग येत असलेले मोजकेच असावेत. बऱ्याच लोकांच्या पायात आवश्यक बूट देखील नव्हते. फक्त काहीतरी साहसी करायला जायच, हि आजकाल मानसिकता झालीये. आणि राजगड तोरणा सारखे किल्ले आजकाल खूपच accesible झालेत. पण तरी सामान्य लोकांमध्ये किमान सुरक्षेच्या दृष्टीने काही जागृती व्हावी, याचाच विचार करत आमचा लास्ट डब्बा (मी, तन्मय अमेय मानसी ) तिथल्याच एका झाडाच्या सावलीत विसावला. जिथे बसलेलो ती जाग बऱ्यापैकी प्रशस्त होती, "पिनाक म्हणत होता तो बस चा रस्ता इथपर्यंत येत असावा ..... U - Turn ला पण जाग आहे इथे !! " आमच्यातल्या कोणीतरी उगाच एक पांचट जोक मारला.
आता आदित्य आणि बाकीचे ८०% किल्ला चढून वर गेले होते. आणि आम्हाला वरून हाका मारत होते. उन देखील वाढायला लागलं होतं. पुन्हा चढाई सुरु ! ... मजल दरमजल करत एकदाच बिनीच्या दरवाज्यातून किल्ल्यात प्रवेश केला. पुढे काही पायऱ्या नंतर कोठीद्वार ओलांडले आणि किल्ल्यावर आलो.
"XXXX काय जबरा दिसतोय !!!! "" .... इथपासून ...."XXXXXX ..... एवढं चालायचयं??? " .इथपर्यंत सगळ्या प्रकारच्या reactions मिळाल्या. पुढे तटबंदीवरून झुंझारमाची बघताना तर "त्या काळातल्या लोकांना त्रिवार दंडवत !" हि एकच भावना होती. नावाला साजेशी "झुंझार" माची (यालाच झुंझारमल माची देखील म्हणतात ) बघतच राहावी असं वाटत होत. फोटोग्राफीला उधाण आलं होतं.
उजव्या बाजूला दूरवर लिंगाणा आणि रायगड आमची सोबत करत होते. रडतोंडी बुरुजापाशी पोहोचलो. आदित्य आणि बाकीचे आधीच बुरुजाखाली सावलीत जाऊन बसले होते. इथे खाली उतरायला लोखंडी शिडी लावलीये. त्यामुळे इथून चढणं-उतरणं सुसह्य झालं आहे. सिंहगड-रायगड केला तेव्हा आम्ही या रस्त्यानी तोरणा चढून मागच्या वाळंजाई दरवाज्यानी खाली भट्टी गावात उतरलो होतो. त्या आठवणी ताज्या झाल्या.
गाव अजूनही गुलाबी थंडीची चादर ओढून झोपलेलंच होतं. तिथल्याच एका पडवीत थोडावेळ विसावलो. काही वेळातच हॉटेलवाल्यानी दार उघडलं आणि चहाचा दुसरा अध्याय पार पडला. बाहेरहि उजाडायला सुरुवात झाली होती. नाष्ट्याला झक्कास मिसळ-पाव. कोणत्याही ट्रेकला जर एकदाही मिसळ नसेल तर तो माझ्या मते फाउल मानला जातो. हॉटेलात इतरही पर्यटक/ हौशी ट्रेकर्स यायला सुरुवात झाली. आम्ही "चक्रम" असल्याचं समजल्यावर त्यांना खूपच आनंद झाला. त्यातल्या बऱ्याच जणांनी "सह्यांकन" मधे सहभाग घेतला होता. "चक्रम" हे नाव ऐकल्यावर त्यांनी ज्या आदरानी/ आश्चर्यानी आमच्याकडे पाहिलं, त्यामुळे चक्रम शी जोडला गेल्याचा पुन्हा एकदा अभिमान वाटला.
"चला ! चला ! चला ! .... " अमेय, मानसीच्या हाका सुरु झाल्या. ट्रेकला सुरुवात करायची वेळ झाली. मानसी, अमेय यांनी एका वाटाड्याशी आधीच बोलून ठेवलं होतं. सीताराम त्याचं नाव ... ते आम्हाला तोरण्यापासून राजगडापर्यंत सोबत करणार होते. पिनाक आणि सीताराम मामा यांच्यात पुढील मार्गावर "सखोल" चर्चा झाली आणि यापुढे गाडी जाणार नाही असं ठरलं. Sack पाठीवर चढवून आम्ही तोरण्याच्या दिशेनी चालू लागलो.
| वेल्ह्यातून तोरणा |
| तोरण्याचा चढ |
| कोठीद्वार |
बाकी सगळे आधीच तिथल्या धर्मशाळा कम राहायच्या खोल्यांच्या पडवीवर विसावले होते. ११.३० वाजले असावेत. आता किल्ला फिरून जेवण करायचं असं सर्वानुमते ठरलं. सीताराम मामा लगेच आम्हाला घेऊन झुंझार माची च्या दिशेने निघाले. ध्वजस्तंभापाशी पोहोचलो आणि अचानक आम्हाला राजगडाचे दर्शन झाले.
"XXXX काय जबरा दिसतोय !!!! "" .... इथपासून ...."XXXXXX ..... एवढं चालायचयं??? " .इथपर्यंत सगळ्या प्रकारच्या reactions मिळाल्या. पुढे तटबंदीवरून झुंझारमाची बघताना तर "त्या काळातल्या लोकांना त्रिवार दंडवत !" हि एकच भावना होती. नावाला साजेशी "झुंझार" माची (यालाच झुंझारमल माची देखील म्हणतात ) बघतच राहावी असं वाटत होत. फोटोग्राफीला उधाण आलं होतं.
![]() |
| भेल बुरुज |
वेळेचं बंधन असल्याने माघारी परतलो. त्याच ओसरीवर जेवण आटोपलं. पुरण पोळी, पुरी भाजी, इडली फ्राय, दहीभात, असे एक से एक भारी पदार्थ जेवायला. सोबतीला ट्रेकचं official जेवण अर्थात ठेपले हे हि होतंच. तिथल्याच तळ्यात पाणी भरून घेतलं.
" निघूया का ? " अमेयचा आदेश! ... सगळे बुधला माचीच्या दिशेनी निघाले. वाटेत मेंगाईदेवीच आणि महादेवाच दर्शन घेतलं आणि कोकण दरवाजा पार करत बुधल्याच्या दिशेने निघालो. दरवाजा पार केल्या केल्या बुधला माची, विशाळा, रडतोंडी बुरुज, घोदेजीन याचं जबरदस्त दर्शन झालं. पूर्ण रस्त्यावर रेलिंग लावले आहेत. काही ठिकाणी तर रेलिंग उलट्या बाजूला (कड्याच्या दिशेला रेलिंग आणि दरी open ) लावलेत. त्याचा कसा उपयोग करावा याचे मार्गदर्शक फलक तिथे लावायला हवेत.
" निघूया का ? " अमेयचा आदेश! ... सगळे बुधला माचीच्या दिशेनी निघाले. वाटेत मेंगाईदेवीच आणि महादेवाच दर्शन घेतलं आणि कोकण दरवाजा पार करत बुधल्याच्या दिशेने निघालो. दरवाजा पार केल्या केल्या बुधला माची, विशाळा, रडतोंडी बुरुज, घोदेजीन याचं जबरदस्त दर्शन झालं. पूर्ण रस्त्यावर रेलिंग लावले आहेत. काही ठिकाणी तर रेलिंग उलट्या बाजूला (कड्याच्या दिशेला रेलिंग आणि दरी open ) लावलेत. त्याचा कसा उपयोग करावा याचे मार्गदर्शक फलक तिथे लावायला हवेत.
उजव्या बाजूला दूरवर लिंगाणा आणि रायगड आमची सोबत करत होते. रडतोंडी बुरुजापाशी पोहोचलो. आदित्य आणि बाकीचे आधीच बुरुजाखाली सावलीत जाऊन बसले होते. इथे खाली उतरायला लोखंडी शिडी लावलीये. त्यामुळे इथून चढणं-उतरणं सुसह्य झालं आहे. सिंहगड-रायगड केला तेव्हा आम्ही या रस्त्यानी तोरणा चढून मागच्या वाळंजाई दरवाज्यानी खाली भट्टी गावात उतरलो होतो. त्या आठवणी ताज्या झाल्या.
आता या पुढचा रस्ता याच डोंगरसोंडेवरून होता. सगळ्यात आधी खुपसा उतार आहे. आणि नंतरची सगळी चाल बऱ्यापैकी सपाट आहे. थोडं पुढे जाऊन सावलीत पाणी प्यायला थांबलो. मागे वळून तोरण्याकडे पाहिलं. अफलातून !!! जेम्स डग्लस असं म्हणाला होता कि "सिंहगड हि जर सिंहाची गुहा असेल तर तोरणा हे गरुडाचे घरटे आहे" ... मानलं ..... १००% .... तोरणा काय भारी दिसत होता म्हणून सांगू ! महाराजांनी किल्ल्याचं नाव प्रचंडगड का ठेवलं याचा पदोपदी प्रत्यय येत होता.
आता फक्त चालत राहायचे. गप्पा मारत मारत सगळे चालत होतो. दूरवर काही धनगर पाडे सोडले तर रस्त्यात कोणतीहि घरं नाहीत. पाण्याचा स्त्रोत तोरण्यावर शेवटचा. मी, अमेय, तन्मय, मानसी सगळ्यात शेवटी गप्पा मारत येत होतो. सावलीत थोडावेळ थांबलो. महाराजांवर खूप गप्पा झाल्या. मानसीनी मस्त झोप काढली. अर्धा तास असाच निघून गेला. बाकी सगळे बराच पुढे पोहोचले असणार. तडक निघालो. रस्त्यात एक सुंदर देवराई लागले. छान जंगल आहे. सगळे तिथे आमची वाट पाहत थांबले होते. तिथे थोडा वेळ विसावलो.
उन उतरायला लागलं होतं. राजगड आता बराच जवळ असल्यासारखा वाटत होता. "भागोजीचा झाप जवळच आलाय, चला लवकर !" शेवटी मजल दरमजल करत आम्ही इष्टस्थळी ५-५.३० ला पोहोचलो. राजगड-तोरणा पूर्ण वाटेवर भागोजीचं घर हा एकच आधार. भागोजींनी खाली मोठ्ठं घर बांधलय, सीताराम मामांनी माहिती पुरवली. भागोजींशी बोलणी केली. त्यांच्या घरात सगळ्यांना राहायची त्यांनी सोय केली. पाणवठ्यावरून आमच्यासाठी पाणी आणून दिलं. चुलीसाठी लाकूडफाटा आणून दिला.
तन्मयनी लगेच चुलीचा ताबा घेतला. शमांगी ताईच्या मार्गदर्शनाखाली आणि अमेयच्या मदतीनी तन्मयनी फक्कडसा चहा (दुध, चहा, साखर, पाणी या सगळ्याच्या मापाचा घोळ घालून ) बनवला. चहापानाबरोबर चकली, कचोरी, चिक्की, लाडू असा फराळ झाला.
"मानसी म्हण कि गाणं !! " प्रत्येक ट्रेकप्रमाणे याही ट्रेकला मानसीला गाणं म्हणायचा आग्रह करण्यात आला. खूप आढेवेढे घेतल्यावर शेती एकदाची मानसी नी आमच्या गाण्याच्या मैफिलीला सुरुवात केली. शमांगी ताई, कौस्तुभ, परिन छान किशोरची गाणी गात होते. लईच धमाल!!! सूर्य कलायला लागलं होता. मावळतीच्या सूर्याच्या किरणांनी आकाशात लाल-तांबड्या रंगाची उधळण केली होती.
तन्मय, अमेय पुन्हा एकदा जेवणाच्या तयारीला लागले. बाहेर भागोजींनी शेकोटी लावली होती. आमच्यातले काही जण त्याच्या आस पास बसले होते. आपट्याच्या पानाची विडी वळून शेकोतीच्याच लाकडांनी ती पेटवली आणि त्याचा एक जबर झुरका मारत भागोजींनी बोलायला सुरुवात केली " ह्ये जग कुनी बनविलं ?? ह्ये आकाशातले तारे कोन पेटवतो? ह्ये मुरुबाचा डोंगर कुनी बनविला ?? एव्ढे शिकलात .... कधी इचार केलाय का तुमी शेहरातल्या लोकांनी ?? " आणि त्यानंतर अर्धा एक तास ते याच विषयावर बोलत होते. माझ्या अल्पमतीला काही ते कळल नाही जास्त. पण त्या शांततेत, मोकळ्या आभाळाखाली, हे असं काही गूढ अगम्य ऐकायला छान वाटत होतं.
एवढ्यात जेवण तयार झाल्याच सांगण्यात आलं. मस्त वाफाळती खिचडी, त्यावर भरपूर तूप, पुरणपोळी, .... मजा आली. जेवण आटोपून सगळी आवरा-आवरी केली आणि झोपायच्या तयारीला लागलो. उद्याच्या दिवसाचा विचार करत स्लीपिंग bag अंथरली. बाहेर शेकोटीतल्या लाकडांचा जळतानाचा फट-फट , आणि रातकिड्यांचा किरर्र किरर्र हे आवाज सोडले तर बाकी सगळीकडे सामसूम होती...... राजगड दूरवर खुणावत होता ... पण मनानी मी कधीच गडावर पोहोचलो होतो.
(क्रमशः)

No comments:
Post a Comment